World Cup 2023 वेळापत्रकात पुन्हा बदल? बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं

Icc World Cup Schedule 2023 | आयसीसीने याआधी 9 ऑगस्ट रोजी ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधील 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

Sanjay patil | Updated on: Aug 21, 2023 | 5:48 PM
1 / 5
आयसीसीने काही दिवसांपूर्वी वनडे वर्ल्ड कपमधील 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या. त्यानंतर आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे वेळापत्रक बदल करण्याबाबत विनंती केली आहे. याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.

आयसीसीने काही दिवसांपूर्वी वनडे वर्ल्ड कपमधील 9 सामन्यांच्या तारखा बदलल्या. त्यानंतर आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे वेळापत्रक बदल करण्याबाबत विनंती केली आहे. याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5

वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही असं बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलंय. राजीव शुक्ला हे स्वत: हैदराबादमध्ये होणाऱ्या सामन्यांचे प्रभारी आहेत. त्यामुळे जर तिथे काही पेचप्रसंग उद्भवला, तर मी तो गुंता सोडवेन, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं.

3 / 5

वर्ल्ड कपचं वेळापत्रक बदलणं इतकं सोपं नाही. वेळापत्रक बदलणं बीसीसीआयच्या हातात नाही. त्यासाठी इतर संघांनाही मर्जीत घ्यावं लागतं. त्यामुळे वेळापत्रकात बदल करणं अवघड असतं.

4 / 5

नियोजित वेळापत्रकानुसार, 9 आणि 10 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये समाने होणार आहेत. या 2 सामन्यांपैकी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या मॅचचाही समावेश आहे. हैदराबाद पोलिसांनी या दोन्ही सामन्यांना सुरक्षा पूरवण्यात असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे.

5 / 5

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्यात बदल करण्याआधी एचसीएला विश्वात घेतलं नाही, ज्यामुळे ही परिस्थिती उद्भवली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us