
जगातील अव्वल 100 खेळाडूंमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दोन आशियाई खेळाडू आहेत. भारताच्या विराट कोहलीचा या यादीत समावेश आहे. भारताचा एकमेव खेळाडू आहे.

विराट कोहली याच्या नावावर एक हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे. 2022 मधील स्पोर्टिकोच्या टॉप 100 सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली 61 व्या स्थानावर आहे.

टीम इंडियाकडून खेळण्याव्यतिरिक्त विराट कोहली इतर माध्यमातून 2.9 दशलक्ष डॉलर्स पैसे कमावतो. विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो.

विराट कोहली जाहिरातींच्या माध्यमातून जवळपास 31 मिलियन डॉलर्स कमावतो. कोहलीचं एकूण निव्वल उत्पन्न 33.9 दशलक्ष डॉलर्स असल्याचं सांगितलं जातं.

2021 मध्ये जगातील टॉप 100 खेळाडूंमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली 59 व्या स्थानावर होता. पण 2022 यादीत दोन क्रमांकाची घसरण होतं विराट कोहली 61 व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी विराट कोहली आशियातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या अव्वल स्थानी होता.

श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली व्यतिरिक्त 25 वर्षीय जापानी टेनिस स्टार नाओमी ओसाका हिचं नाव येतं. तिने आपल्या कारकिर्दीत चार ग्रँडस्लॅम, दोन यूएस ओपन आणि दोन ऑस्ट्रेलियन ओपन किताब जिंकले आहेत.

जगभरातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ओसाका 20 व्या स्थानावर आहे. तर आशियाई खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. या यादीत यूएस आणि युरोपियन अॅथलीट्सचं वर्चस्व आहे.

ओसाकाची एकूण कमाई 53.2 दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. यापैकी 1.2 दशलक्ष डॉलर्स स्पर्धे जिंकून येतात. तर 52 दशलक्ष डॉलर्स जाहिरातींमधून येतात.