
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. 12 वर्षानंतर टीम इंडिया इतिहास रचेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वा 15 खेळाडूंचा संघ तयार आहे.

टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यासाठी काय करावं लागेल. स्पर्धेत किती सामने जिंकावे लागतील? वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? जाणून घ्या समीकरण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत राउंड रॉबिन फॉर्मेट लागू आहे. म्हणजेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना नसेल. म्हणजेच उपांत्य फेरीपर्यंत संघ एकमेकांविरोधात सामने खेळतील.

राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियाला 9 सामने खेळायचे आहेत. यापैकी 7 सामने जिंकताच टीम इंडिया उपांत्य फेरीत जागा मिळवेल.

एखादा संघ सहा सामने जिंकूनही उपांत्य फेरी गाठू शकतो. पण तेव्हा रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला राउंड रॉबिन फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवावा लागेल.