AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्रांतिज्योती विद्यालय’मधून संकर्षण कऱ्हाडेचा सीन डिलीट; काही म्हणाले ‘बरं झालं’ तर काहींनी केली ही विनंती

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटातून काढून टाकलेला एक सीन हेमंत ढोमेनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण म्हणाले, बरं झालं. तर काहींनी हा सीन का काढला, असा सवाल केला आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय'मधून संकर्षण कऱ्हाडेचा सीन डिलीट; काही म्हणाले 'बरं झालं' तर काहींनी केली ही विनंती
Sankarshan KarhadeImage Credit source: Facebook
| Updated on: Feb 05, 2026 | 7:58 PM
Share

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. जवळपास 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी या उद्देशाने आणि हेच मुद्दे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत गेला आणि सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा झाली. त्याचवेळी हेमंतने या चित्रपटातून डिलिट केलेला म्हणजेच काढून टाकलेला एक सीन सोशल मीडियावर पोस्ट केला. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेवर चित्रित झालेला हा सीन आहे. या सीनवर आता नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘संकर्षण कऱ्हाडे यांचा प्रसंग.. जो काही कारणास्तव चित्रपटात ठेवता आला नाही. पण आता संपूर्ण प्रसंग खास तुमच्यासाठी. मंडळी आपली मातृभाषा हीच भगवंताच्या अधिक जवळ नेणारी भाषा आहे,’ असं कॅप्शन देत हेमंतने हा डिलिट केलेला सीन शेअर केला आहे. यामध्ये संकर्षण मराठी भाषेला जपण्यासंदर्भात वासुदेव, वारी, नंदीबैलवाला अशी विविध उदाहरणं देताना दिसतोय. “रोज सकाळी तुमच्या दारावर जो वासुदेव यायचा, तो येतो का? गोंधळी येतो का? जोगते येतो का? हे सगळं सोडा. ज्याला तुम्ही कौल विचारायचा, तो बुगूबुगू करणारा नंदी येतो का? दुर्दैव आहे मंडळी, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. याच्याही पलीकडे जाऊन सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने निघणारी वारी तरी निघल का”, असे प्रश्न तो विचारताना दिसतोय.

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणाऱ्या नेटकऱ्यांमध्येच दोन गट पडले आहेत. त्यापैकी एक गट या डिलिट केलेल्या सीनच्या बाजूने बोलत खंत व्यक्त करतोय. तर दुसरा गट हा सीन घेतला नाही ते बरं झालं, असं समाधान व्यक्त करतोय. ‘बरं झाला काढला, काही उपयोग नव्हता. वासुदेव आणि जी उदाहरणं दिली ती अभिमान आनंदाची गोष्ट आहे का,’ असा सवाल एकाने केला. तर ‘कोणी काहीही म्हणो, मला नाही वाटत चित्रपट केवळ भावनिक होता. सर्व मुद्दे उत्तम मांडले होते,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘हा सीन काढायला नको होता. काहीच चुकीचं नाही या सीनमध्ये,’ असं मत एकाने मांडलंय. तर ‘बरं झालं हा सीन ठेवला नाही. चित्रपट चांगला झाला. अजूनही हरिजन शब्दाचं, वासुदेव, नंदीबैलवाल्याचं आकर्षण संपत नाही ही एक समस्या आहेच. तुमच्या चांगल्या चित्रपटातून ती पुन्हा ठसायला नको होती,’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?