
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर आता 2 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माऐवजी शुबमन गिल याला नेतृत्वाची संधी मिळू शकते. रोहितला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्रास जाणवला होता. त्यामुळे रोहितला या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. (Photo Credit : Icc X Account)

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहितच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ऋषभ पंत किंवा वॉशिंग्टन सुंदर या दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. (Photo Credit : Rishabh Pant X Account)

रोहितला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या त्रासामुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. तेव्हा रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधार या नात्याने शुबमनने काही ओव्हर कर्णधार म्हणून सूत्रं हातात घेतली होती. (Photo Credit : Bcci X Account)

टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर बुधवारी सराव केला. रोहितने या सराव सत्रात बॅटिंग केली नाही. रोहितने काही वेळ कोचच्या उपस्थितीत धावण्याचा सराव केला. मात्र रोहित या दरम्यान फिट वाटला नाही. (Photo Credit : PTI)

टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचलीय. मात्र आता उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान असणार? हे निश्चित नाही. (Photo Credit : Bcci X Account)

टीम इंडिया साखळी फेरीतनंतर ए ग्रुपमध्ये अव्वल स्थानी राहिली तर त्या सामन्यानंतर 1 दिवसाची विश्रांती मिळेल. उपांत्य फेरीतील सामना हा 4 मार्चला तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा 2 मार्चला होईल. (Photo Credit : Bcci X Account)