
टीम इंडिया-पाकिस्तान या दोन्ही संघांनी आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळले आणि जिंकले. आता उभयसंघात 14 ऑक्टोबर रोजी महामुकाबला होणार आहे. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांचे आकडे कसे आहेत, हे जाणून घेऊयात.

भारत-पाकिस्तान एकूण 134 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 56 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने 72 वेळा बाजी मारलीय.

तसेच दोन्ही संघातील एकूण 5 सामन्यांचा निकाल लागला नाही. तसेच एकही सामना बरोबरीत सुटला नाही.

तसेच टीम इंडियाने आपल्या होम पिचवर 11 सामने जिंकलेत. तर पाकिस्ताननेही 14 मॅचमध्ये होम पिचवर बाजी मारलीय.

टीम इंडियाने पाकिस्तानला त्यांच्या घरात जाऊन 11 वेळा पराभूत केलंय. तर पाकिस्तानने टीम इंडियावर भारतात 19 सामन्यात विजय मिळवलाय.

तसेच हे दोन्ही संघ एकूण त्रयस्थ ठिकाणीही खेळले आहेत. टीम इंडियाने न्यूट्रल वेन्यूवर 34 सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानलाही 40 वेळा विजय मिळवण्यात यश आलंय.