इसीबी अर्थात इंग्लंड क्रिकेट बोर्ड खेळाडूंची फॉर्मेटवाईज वर्गवारी करते. टेस्ट आणि वनडे क्रिकेट खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी असते. तसेच व्हाईट आणि रेड या दोन्ही बॉलने खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी असते.

व्हाईट आणि रेड या दोन्ही बॉलने खेळणाऱ्या खेळाडूंना 9 कोटी 10 लाख रुपये वार्षिक मिळतात. टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनापेक्षा इंग्लंडला मिळणारी ही रक्कम 2 कोटींनी जास्त आहे. बीसीसीआय ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंना सर्वाधिक 7 कोटी रुपये देते.

इंग्लंड बोर्ड वनडे आणि टी 20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना वार्षिक 2 कोटी 53 लाख रुपये 3 कोटी 54 लाख दरम्यान वेतन मिळतं. तर टीम इंडियाच्या बी आणि सी कॅटेगरीतील खेळाडूंना अनुक्रमे 3 आणि 1 कोटी रुपये मिळतात.

इंग्लंडच्या खेळाडू्ंना वार्षिक कराराशिवाय एका सामान्यासाठीही चांगलं मानधन दिलं जातं. इंग्लंडच्या खेळाडूंना 1 कसोटी सामन्यासाठी 14 लाख 65 हजार रुपये मिळतात. वनडे आणि टी 20 च्या एका सामन्यासाठी 4 लाख 55 हजार रुपये मिळतात. तर टीम इंडियाच्या खेळाडूंना एका टेस्टसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 आणि टी 20 साठी 3 लाख रुपये दिले जातात.