IND vs AFG: हिटमॅन सज्ज, अफगाणिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच रोहित रेकॉर्ड ब्रेक
India vs Afghanistan Dharamsala ODI: भारतीय एकदिवसीय संघातील अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा अफगाणिस्तान विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा सामना धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला या सामन्यात मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. (Photo Credit: PTI)

रोहितच्या नावावर पहिल्याच सामन्यात धावांबाबत नाही तर वयाबाबत मोठा विक्रम होणार आहे. या विक्रमबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

रोहित 13 जूनला पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा त्याचं वय 39 वर्ष 44 दिवस इतकं असेल. रोहित यासह भारतासाठी सर्वात जास्त वयात एकदिवसीय सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरेल. (Photo Credit: PTI)

भारताकडून सर्वात जास्त वयात एकदिवसीय सामना खेळण्याचा विक्रम हा माजी खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावर आहे. अमरनाथ यांनी वयाच्या 39 वर्ष 36 व्या दिवशी एकदिवसीय सामना खेळला होता. (Photo Credit: PTI)

आता 13 जून रोजी रोहित शर्मा मोहिंदर अमरनाथ यांचा 37 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढणार आहे. रोहितकडून चाहत्यांना या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. (Photo Credit: PTI)