
चेन्नईमध्ये होणाऱ्या तिसरा एकदिवसीय सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. ही 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तसेच टीम इंडियाचं वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानही या सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.


या मैदानात टीम इंडियाकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे. धोनीने एकूण 6 सामन्यांमध्ये 401 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर विराट कोहलीने चेपॉक स्टेडियममध्ये 7 सामन्यात 283 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

टीम इंडियासाठी सर्वात मोठी गूड न्यूज म्हणजे या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपस्थित राहणार आहे. याआधी धोनी विराट आणि रोहित शर्मा यांची भेट घेणार आहे.
