IND vs AUS ODI : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत खेळणार नाही, कारण…
India vs Australia, 1st ODI: टीम इंडियाचा कर्णधार पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याचं जाहीर होतं. पण आता का खेळणार नाही? याचं कारण समोर आलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना 17 मार्च रोजी आहे. 3 वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईत होणार आहे पण रोहित शर्मा त्यात खेळणार नाही. रोहित पहिला वनडे सामना का खेळणार नाही याचे कारण आता समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी निवड समितीने कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत कर्णधारपद भूषवणार आहे.

सोशल मीडियावर रोहित शर्मा पहिल्या एकदिवसीय सामन्यात न खेळण्यामागील कारण समोर आलं आहे. तो मेव्हणाच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याने पहिल्या वनडेत खेळणार नाही.

रोहित शर्माने श्रेयस अय्यरसह अलीकडेच शार्दुल ठाकूरच्या लग्नात हजेरी लावली होती. शार्दुलच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर मालिकेतील चौथी आणि शेवटची कसोटी खेळण्यासाठी तो अहमदाबादला गेला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. (All Photo: Instagram/Rohit Sharma/Shreyas Iyer)