IND vs ENG : भारताविरुद्ध बॅटिंग न करताच जो रूट रचणार इतिहास, राहुल द्रविडचा विक्रम रडारवर

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत अनेक विक्रम रचले जाणार आहेत. तसेच काही विक्रम मोडले जाणार आहेत. जो रूट या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. यासाठी त्याला फलंदाजी करण्याची गरज नाही.

| Updated on: Jun 20, 2025 | 9:37 PM
1 / 5
जो रूटने मागच्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने कसोटी 13 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात त्याने 36 शतकं ठोकली आहेत. आता त्याची नजर एका वेगळ्या विक्रमाकडे आहे.  (फोटो- पीटीआय)

2 / 5
जो रूट हा विक्रम फलंदाजीने नाही तर क्षेत्ररक्षण करून मोडणार आहे. केएल राहुलचा झेल पकडला आणि राहुल द्रविडच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. जो रूटने कसोटी स्वरूपात 209 झेल घेतले आहेत. (फोटो- पीटीआय)

3 / 5
भारतीय दिग्गज राहुल द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 210 झेल घेतले आहेत. आता जर जो रूटने आणखी दोन झेल घेतले तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा नॉन विकेटकीपर खेळाडू ठरेल. (फोटो- Getty)

4 / 5
दुसरीकडे, टीम इंडियाविरुद्ध  55 कसोटी डाव खेळणारा जो रूट फक्त एकदाच शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळेच या मालिकेत जो रूट विरुद्ध टीम इंडियाचे गोलंदाज अशी लढत आहे. (फोटो- Getty)

5 / 5
जो रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 153 सामने खेळले आहेत. 279 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यात रूटने  22612 चेंडूंचा सामना केला आहे आणि एकूण 13006 धावा केल्या आहेत. (फोटो- Getty)