
टीम इंडियाचा युवा खेळाडू रजत पाटीदार पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. रजत पाटीदार इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील चौथ्या डावात अपयशी ठरला.

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी टीम इंडियाची सलामी जोडी झटपट आऊट झाली.

यशस्वी जयस्वाल याच्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आऊट झाला. त्यामुळे टीम इंडिया बॅकफुटवर गेली.

रोहित आऊट झाल्यानंतर रजत पाटीदार मैदानात आला. रजत पाटीदारवर झटपट 2 विकेट्स गेल्यानंतर मोठी जबाबदारी होती. पण रजतने पुन्हा निराशा केली. रजत तिसऱ्या सामन्यानंतर चौथ्या सामन्यातही झिरोवर आऊट झाला.

रजत पाटीदार सलग दुसऱ्यांदा झिरोवर बाद झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रजतला अपयशी ठरल्यांनतरही संधी काय दिली जातेय? तो कुणाच्या वशिल्यावर खेळतोय का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रजत पाटीदार याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली याच्या जागी संधी देण्यात आली आहे. विराटने कौटुंबिक कारणामुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली.

दरम्यान रजत पाटीदार याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत रजतला आपली छाप सोडता आलेली नाही. रजतने आतापर्यंत अनुक्रमे 32,9,5,0,17 आणि 0, अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे रजतचं टेस्ट करिअर आता संपलं असल्याचं म्हटलं जात आहे.