
रोहित शर्मा वयाच्या तिशी ओलांडल्यानंतर सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा फलंदाज ठरला आहे. रोहितने सचिनच्या 35 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता रोहितचा निशाणा सचिनला मागे टाकण्याकडे असणार आहे.

रोहित शर्माने 2021 पासून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी खेळी केल्या आहेत. रोहित 6 शतकांसह अव्वल स्थानी आहे. तर त्यानंतर शुबमन गिल 4, जडेजा, पंत, केएल आणि यशस्वी या चौघांच्या नावे प्रत्येकी 3-3 शतकांची नोंद आहे.

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा फलंदाज ठरलाय. रोहितने 600 सिक्सचा टप्पा पार केला आहे. रोहितच्या आसपासही एकही फलंदाज नाही.

रोहितने ओपनर म्हणून ख्रिस गेल याच्या 42 शतकांचा विक्रम मोडीत काढलाय. रोहितच्या नावावर आता ओपनर म्हणून 43 शतकांची नोंद झाली आहे. तर ओपनर म्हणून सर्वाधिक 45 शतकांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.

रोहितने टीम इंडियाकडून ओपनर म्हणून सुनील गावस्कर यांच्या इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित आणि गावस्कर या दोघांच्या नावावर इंग्लंड विरुद्ध प्रत्येकी 4-4 शतकं आहेत.