
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याला काही तासच शिल्लक आहेत. टीम इंडिया या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेमी फायनलआधी वानखेडे स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. आयसीसीने टीम इंडियाच्या सरावाचे फोटो शेअर केले आहेत.

रनमशीन विराट कोहली याने नेट्समध्ये जोरदार सराव करत घाम गाळला. विराटकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा आहे.

ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही वानखेडे स्टेडियममध्ये सहकाऱ्यांसह प्रॅक्टीस केली. जडेजा सरावानंतर घामाघूम झालेला दिसून आला.

कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड या दोघांनी या दरम्यान चर्चा केली. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सरावानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी काही वेळ गप्पा मारल्या. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन टाईमपास करताना दिसत आहेत.