
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात केएल राहुल याच्या नेतृत्वात युवा खेळाडूचं 2 वर्षानंतर एकदिवसीय संघात कमबॅक झालं. मात्र या फलंदाजाला या संधीचा फायदा घेता आला नाही. (Photo Credit : PTI)

ऋतुराज गायकवाड याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. ऋतुराजचा यासह 2 वर्षानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. ऋतुराजने अखेरचा एकदिवसीय सामना हा डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळला होता. (Photo Credit : Getty)

ऋतुराजने नुकतंच दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 3 मॅचच्या वनडे अनऑफीशियल सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. ऋतुराजने 3 सामन्यांमध्ये 1 शतकासह 210 धावा केल्या होत्या. त्याच जोरावर ऋतुराजला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं. (Photo Credit : PTI)

ऋतुराजच्या या कामगिरीमुळे त्याच्याकडून भारतीय संघाला रांचीत मोठ्या खेळीची आशा होती. मात्र ऋतुराजने निराशा केली. ऋतुराज 8 धावांवर आऊट झाला. त्यामुळे ऋतुराजला दुसऱ्या सामन्यात संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : Getty)

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना 3 नोव्हेंबरला होणार आहे. आता पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंट ऋतुराजला दुसर्या सामन्यात संधी देत विश्वास दाखवणार का? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit : Getty)