IND vs SA Test : केएल राहुलच्या शतकाने टीम इंडियाची लाज राखली! विदेशी भूमीवर सातवं शतक

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलने एकाकी झुंज दिली. केएल राहुलने दोन वर्षानंतर कसोटीत शतक झळकावलं आहे. त्याच्या खेळीमुळे भारताने 245 धावांवर मजल मारली आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा सन्मानजनक स्कोअर आहे.

| Updated on: Dec 27, 2023 | 3:15 PM
1 / 6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. खेळपट्टीचे स्वरूप पाहता दक्षिण आफ्रिकेला आव्हान देण्यासाठी ही चांगली धावसंख्या आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. खेळपट्टीचे स्वरूप पाहता दक्षिण आफ्रिकेला आव्हान देण्यासाठी ही चांगली धावसंख्या आहे.

2 / 6

भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

3 / 6

केएल राहुलने पहिल्या डावात संघ अडचणीत असताना शतक झळकावले. त्याने 137 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या.

4 / 6

केएल राहुलने आतापर्यंत एकूण 8 कसोटी शतके झळकावली आहेत. यापैकी 7 शतकं परदेशात झळकावली आहेत. राहुलची परदेशी भूमीवर 7 शतकं ही दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध आहेत.

5 / 6

कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर केएल राहुलने शतक ठोकलं आहे. त्याने शेवटचं सातवं शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलं होतं.

6 / 6

केएल राहुलचे सेंच्युरियनमधील हे दुसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने डिसेंबर 2021 मध्ये याच मैदानावर शतक झळकावले होते. ती बॉक्सिंग डे टेस्ट होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us