
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौरा केला. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पण 2-0 ने पराभवाचं तोंड पाहून परतावं लागलं. या वर्षातील ही भारताची शेवटची वनडे मालिका होती.

शेवटच्या वनडे मालिकेसोबत 2024 या वर्षात भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. 38 वर्षे जुना नकोसा विक्रम पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे. हा नकोसा विक्रम म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला या वर्षात वनडेत शतक झळकावता आले नाही.

कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 38 वर्षांपूर्वी असा विक्रम झाला होता. 1985 मध्ये टीम इंडियासोबत घडली होती. वर्षभरात वनडे सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते.

एकाही फलंदाजाने शतक न झळकावण्याची 38 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 1985 मध्ये भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सर्वाधिक 93 धावा केल्या होत्या.
