13 वर्षापूर्वी याच दिवशी विराट कोहली पहिल्यांदा मैदानात उतरला, पहिल्या सामन्यात किती धावा?

| Updated on: Aug 18, 2021 | 2:25 PM

2008 मध्ये भारताला अंडर-19 विश्व चषक जिंकून देणारा विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फार खाच खळग्यांनी सुरु झाली होती. 13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते.

1 / 6
भारतीय क्रिकेट संघाचा  कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ज्याला लाडाने 'किंग कोहली' म्हटलं जातं, त्याने आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्षांपूर्वी पदार्पण केलं होतं. 18 क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या विराटने 18 ऑगस्ट, 2008 रोजीच 19 वर्षाच्या वयात श्रीलंका संघाविरुद्ध दांबुला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. पहिल्या सामन्यात अवघ्या 12 धावांवर बाद झालेला विराट पुढे जाऊन क्रिकेट जगताचा बेताज बादशाह होईल असे कोणालाच वाटले नसावे...पण हे झाले धावांसह शतकांचा डोंगर उभा करणारा विराट सध्या जगातील अव्वल फलंदाजामध्येही अव्वल आहे.

2 / 6
कोहली सर्वात आधी जगासमोर आला तो म्हणजे 2008 मध्ये त्याने अंडर-19 विश्वचषक भारताला जिंकवून दिला तेव्हा. त्यानंतर त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी संघात स्थान मिळालं. संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू होते. पण ऐन दौऱ्याआधी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग दुखापतग्रस्त झाल्यामुळे विराटला सलामीला येण्याची संधी मिळाली. पहिले तीन सामने फ्लॉप गेल्यानंतर   चौथ्या सामन्यात विराटने पहिलं अर्धशतक ठोकलं. 66 चेंडूत 54 धावा करणाऱ्या विराटने  5 सामन्यांच्या मालिकेत केवळ 159 धावाच केल्या.

3 / 6
पहिल्या मालिकेत खास कामगिरी न केल्यामुळे विराट संघाबाहेर झाला. एक वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर विराटने सप्टेंबर 2009 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्टइंडीज विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात संघात पुनरागमन केलं. नाबाद 79 धावांच्या मदतीने विराटने सामनावीराचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर डिसेंबर 2009 मध्ये कोलकाता येथे विराटने श्रीलंकेविरुद्द 107 धावा ठोकत पहिलं अर्धशतक ठोकलं. ज्यानंतर त्याची संघात जागा निश्चित झाली.

4 / 6
एकदिवसीय सामन्यात उत्तम कामगिरीनंतर विराटने टी20 संघातही स्थान मिळवलं. 12 जून 2010 रोजी झिम्बाब्वे दौऱ्यावर कोहलीने पहिली टी-20 मॅच खेळत 21 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. ऑक्टोबर 2012 मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध विराटने पहिले टी-20 अर्धशतक ठोकले. त्याने 48 चेंडूत 68 धावा केल्या.

5 / 6
विराटला कसोटी पदार्पणासाठी मात्र तब्बल तीन वर्ष वाट पाहावी लागली. 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर संघातील सदस्य असल्याने लगेचच विराटला कसोटी सामन्यात संधी मिळाली. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत विराटने दोन्ही डावात मिळूून केवळ 15 धावा केल्या. 6 महिने आणि 7 सामन्यांनंतर कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एडिलेड येथे 112 धावा करत पहिले शतक ठोकले.

6 / 6
त्यानंतर मागील 13 वर्षांत विराट कोहलीने एक फलंदाजच नाहीतर उत्तम असा कर्णधार म्हणूनही जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 94 कसोटीसामन्यात 7 हजार 609 धावांसह 27 शतकं आणि 25 अर्धशतकं आहेत. तर 254 एकदिवसीय सामन्यांत 43 शतकांसह 62 अर्धशतकं नावावर आहेत. त्याने वनडेमध्ये 12 हजार 169 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये कोहलीने एकही शतक ठोकले नसले तरी 90 सामन्यांत 28 अर्धशतकं मात्र केली आहेत. त्याने 3 हजार 159 धावा आपल्या नावे केल्या आहेत.