
चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराउंडर ड्वेन प्रिटोरियस आयपीएल 2023 साठी भारतात आला आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जिलमा आणि मुलगा हे दोघेही भारतात आले आहेत. सीएसकेने ड्वेनला ऑक्शनमधून 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

जिलमा काम सोडून ड्वेनसोबत आयपीएलसाठी भारतात आली आहे. जिलमा ही एक बिझनेसवुमन आहे. जिल्मा दक्षिण आफ्रिकेतील स्पा सेंटरमध्ये लेझर हेयर रिमूवल सर्व्हिस देते.

जिलमा सेशननुसार पैसे आकारते. जिलमा एका ग्राहकाकडून 10 सेशनचे एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक फी आकारते. जिलमाने भारतात येण्याच्या काही दिवसांआधी व्यवसाय वाढवलेला.

जिलमा आणि ड्वेन २०१४ साली विवाहबद्ध झाले होते. याआधी दोघांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केलं. दोघेही 2017 मध्ये आई-बाबा झाले.

जिलमा आणि ड्वेन या दोघांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर कुटुंबियांचा खूप सुंदर फोटो आहेत. जिलमा आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा उपयोग हा व्यवसाय वाढवण्यासाठी करते.