
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स टीमवर 15 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह आपला विक्रम आणखी भक्कम केलाय.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहचण्याचा आपला रेकॉर्ड आणखी मजबूत केला आहे.चेन्नईने फायनलमध्ये पोहचण्याबाबत दुहेरी आकडा गाठला आकडा गाठला आहे.चेन्नईची आयपीएल फायनलमध्ये पोहचण्याची दहावी वेळ ठरली आहे.

चेन्नईनंतर सर्वाधिक वेळा फायनलमध्ये मुंबई इंडियन्स पोहचली आहे. मुंबईने एकूण 6 वेळा फायनलमध्ये धडक दिली आहे. मुंबईने या 6 पैकी 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर एकदाच ते पण चेन्नई विरुद्धच पराभूत झालीय.

मुंबईनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 3 वेळा अंतिम फेरीत पोहचलीय. मात्र आरसीबीला एकदाही ट्रॉफी जिंकण्यात यश आलेलं नाही. यंदाही आरसीबीचं आव्हान साखळी फेरीतच संपलं.

कोलकाता नाईट रायडर्स एकूण 3 वेळा फायनलमध्ये पोहचलीय. त्यापैकी 2 वेळा केकेआरने गौतम गंभीर याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर मात्र एकदा पराभव स्वीकारावा लागला.