
IPL 2023 Final CSK vs GT: महेंद्रसिंग धोनीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL अंतिम सामन्यात खेळून अनेक विक्रम केले आहेत.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात महेंद्रसिंह धोनी 250 सामने खेळणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.

धोनी सर्वात जास्त आयपीएल फायनल खेळणारा खेळाडू बनला आहे. धोनी सीएसकेसाठी एकूण 10 फायनल खेळला आहे. त्याने रायझिंग पुणे जायंट्सकडून 1 अंतिम सामनाही खेळला आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक प्लेऑफचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. महेंद्रसिंह धोनीने एकूण 28 प्लेऑफ सामने खेळले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैनाने 24 प्लेऑफ सामने खेळले आहेत.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक फायनल खेळणारा कर्णधार होण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. एमएसडीने 10 वेळा अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व केले आहे.

चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या.