
आयपीएलच्या 16 व्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात होतेय. पंजाब किंग्सचं कर्णधारपदाची जबाबदारी यंदा शिखर धवन याच्याकडे देण्यात आली आहे. शिखरला या मोसमात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

शिखरने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण विविध 9 मोसमांमध्ये किमान 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामुळे आता या हंगामात 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करुन 10 व्यांदा अशी कामगिरी करुन आगळावेगळा विक्रम करण्याची संधी आहे.

शिखरने आतापर्यंत 2011, 2012, 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021 आणि 2022 या मोसमात किमान 400 आणि त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

यामुळे शिखर यंदाच्या मोसमात 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

दरम्यान पंजाबचा या मोसमातील सलामीचा सामना हा 1 एप्रिल रोजी कोलकाता विरुद्ध मोहालीत खेळवण्यात येणार आहे.