IPL 2023 : आर. अश्विनच्या पत्नीने केला प्रेमकथेचा उलगडा, संपूर्ण शाळेला माहिती होतं की…

आयपीएल स्पर्धा सुरु असताना काही खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती समोर येत आहे. आर अश्विनच्या पत्नीने त्यांच्या प्रेमकथेबाबत सांगितलं.

| Updated on: May 05, 2023 | 4:20 PM
1 / 8
भारतीय संघाचा स्टार फिरकीपटून आर. अश्विन सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याची पत्नी प्रीती नारायण त्याच्या प्रत्येक सामन्यात हजर असते.

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटून आर. अश्विन सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याची पत्नी प्रीती नारायण त्याच्या प्रत्येक सामन्यात हजर असते.

2 / 8

प्रीतीने जियो सिनेमाच्या एका शोमध्ये अश्विन आणि तिच्या प्रेमकहाणीबाबत खुलासा केला. तिने सांगितलं की, अश्विन आणि मी एकाच शाळेत शिकत होतो. अश्विन सातवीपासूनच माझ्यावर प्रेम करत होता.

3 / 8

अश्विन क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी शाळेतून गेला. पण आम्ही संपर्कात होतो. आम्ही मोठे झालो आणि पुन्हा भेटलो. अश्विन माझ्यावर प्रेम करत होता हे संपूर्ण शाळेला माहिती होतं.

4 / 8

चेन्नईच्या एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला आणि दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुलले. कुटुंबीय एकमेकांना चांगले ओळखत असल्याने कधीच विरोध झाला नाही.

5 / 8

खूप दिवसांनी अश्विन एक दिवस मला भेटला. तेव्ही मी चेन्नई सुपर किंग्स संघात अकाउंटटं म्हणून काम करत होते. तेथून आमचं नातं आणखी घट्ट झालं.

6 / 8

दहा वर्षे एकमेकांना ओळखल्यानंतर पहिल्यांदा अश्विनने डेटबाबत विचारलं आणि प्रेमप्रकरण पुढे गेलं. अश्विन एक दिवस मला थेट क्रिकेटच्या मैदानावर घेऊन गेला आणि हे आयुष्य असेपर्यंत मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे, असं म्हणाला.

7 / 8

अश्विन आणि प्रीतीचं लग्न 2011 मध्ये झालं. या जोडप्याने पारंपारिक तमिळ विवाह विधीनुसार लग्न केले. मात्र, अश्विन आणि प्रीतीच्या लग्नसोहळ्याला क्रिकेट जगतातील बडे स्टार्स उपस्थित राहू शकले नाहीत.

8 / 8

अश्विन आणि प्रीती या जोडप्याला दोन मुली आहेत. अखिरा आणि आध्या अशी मुलींची नावा आहेत. प्रीती सोशल मीडियावर सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us