
राजस्थान रॉयल्स टीमचा आक्रमक बॅट्समन शिमरॉन हेटमायर आपल्या बायकोची आठवण सतावतेय. शिमरॉन त्याच्या बायकोला मिस करतोय. शिमरॉन आयपीएमध्ये खेळत असल्याने तो त्याच्या बायकोपासून दूर आहे.

शिमरॉनने सोशल मीडियावर त्याची पत्नी निरवानी हीचे फोटो शेअर केले आहेत. "या खास दिवशी मी तुझ्यासोबत नाही यावर मला विश्वास बसत नाही", असं कॅप्शन शिमरॉन याने दिलंय.

शिमरॉनची पत्नी निरवानी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. तसेच ती उद्योजिका आहे. शिमरॉनने निरवानी हीला ख्रिसमस 2019 ला लग्नासाठी मागणी घातली होती.

शिमरॉनची पत्नी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. रिपोर्टनुसार शिमरॉन आणि निरवानी या दोघांच्या प्रेमाची सुरुवात फेसबूकवरुन झाली.

निरवानीने आयपीएल सामन्यांदरम्यान अनेकदा उपस्थिती लावली आहे. शिमरॉनने आतापर्यंत आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 5 सामन्यात 183 धावा केल्या आहेत.