IPL 2023 : रवींद्र जडेजाची टी 20 क्रिकेटमध्ये ‘ट्रिपल सेंच्युरी’, अशी कामगिरी करणारा आठवा खेळाडू

| Updated on: Apr 29, 2023 | 6:11 PM

IPL 2023 : रवींद्र जडेजा भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीने त्याने भल्याभल्या संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. रवींद्र जडेजाने टी 20 क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकलं आहे. अशी कामगिरी करणारा तो आठवा भारतीय खेळाडू आहे.

1 / 5
आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स जबरदस्त कामगिरी करत आहे. आठ पैकी पाच सामन्यात विजय मिळवत दहा गुणांसह चेन्नईचा संघ अव्वल स्थानी आहे. गुणतालिकेतील पहिल्या चार संघांचे प्रत्येकी दहा गुण आहेत. मात्र राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना चेन्नईने 32 धावांनी गमावल्याने रनरेटवर फरक पडला. असं असलं तरी रवींद्र जडेजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

2 / 5
रवींद्र जडेजाने टी 20 क्रिकेटमध्ये मैलाचा दगड पार केला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 300 सामन्याचा टप्पा रवींद्र जडेजाने गाठला आहे. अशी कामगिरी करणारा आठवा भारतीय खेळाडू आहे.

3 / 5
300 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन आणि आर. अश्विन यांच्यानंतर आता रवींद्र जडेजाला हा मान मिळाला आहे.

4 / 5
रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 300 वा टी 20 सामना खेळला. 300 टी 20 सामन्यात जडेजाने 3226 धावा आणि 204 गडी बाद केले आहेत. टी 20 मध्ये त्याची 16 धावा देत 5 गडी बाद ही सर्वोत्तम खेळी आहे.

5 / 5
रवींद्र जडेजाने 300 पैकी 164 सामने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. एका संघासाठी 150 हून अधिक सामने खेळणारा तिसरा खेळाडू आहे. धोनी 235 आणि सुरेश रैना चेन्नईकडून 200 सामने खेळला आहे. जडेजाने भारतासाठी 64 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.