
आयपीएलच्या 65व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार आहेत. हैदराबादमध्ये होणारा हा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल तर फाफ डू प्लेसिसच्या संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचीही या सामन्याकडे नजर आहे. आरसीबीने हा सामना गमावल्यास सीएसके आणि एलएसजीला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल.

सीएसके आणि एलएसजी संघ 15 गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबी संघ हैदराबाद विरुद्ध हरला आणि पुढचा सामना जिंकला तरीही त्याचे केवळ 14 गुण होतील.

आज जर सनरायझर्स हैदराबादने संघ जिंकला, तर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरे आणि तिसरे स्थान मिळवतील.

सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने पुढील सामना जिंकल्यास त्यांना 16 गुण मिळून प्लेऑफमध्ये प्रवेश करता येईल. याशिवाय अन्य कोणत्याही संघाला 16 गुण मिळवण्याची संधी नाही.

आरसीबी संघाच्या निकालामुळे लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स 15 गुणांसह प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होईल. पण आरसीबीने सामना जिंकल्यास सीएसके आणि एलएसजी यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांचे पुढील सामने जिंकावे लागतील.