
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विराट कोहली, कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल या तिकडीने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकत मोठा कारनामा केला आहे.

विराट कोहली याने 44 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या.

फाफ डु प्लेसीस याने 46 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 79 रन्सची इनिंग खेळली.

ग्लेन मॅक्सवेल याने 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 59 धावा चोपल्या.

आरसीबीसाठी अनुक्रमे पहिल्या 3 फलंदाजांनी अर्धशतक ठोकण्याची आयपीएलच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. विराट, फाफ आणि ग्लेन या तिघांनी ही कामगिरी करुन दाखवली.