
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर शेवटच्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. अर्जुन तेंडुलकर याने टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं, यासह हैदराबादचा गेम ओव्हर झाला. अर्जुनची ही आयपीएलमधील पहिली विकेट ठरली. आपल्या लेकाने हुशारीने दबावात न येता संयमाने टाकलेली 20 ओव्हर पाहून बाप मनाच्या माणसाचा म्हणजेच सचिन तेंडुलकर याचा उर भरून आला.

हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज होती. कॅप्टन रोहित शर्मा याने अर्जुनला बॉलिंग दिली. अर्जुनचा हा दुसराच सामना. मात्र त्यानेही आपण तेंडुलकरचा मुलगा असल्याच दाखवून दिलं. हैदराबादला 20 धावांची गरज असताना अर्जुनने अवघ्या 5 धावाच दिल्या.

शेवटची ओव्हर टाकताना प्रत्येक गोलंदाजावर एक दबाव असतो. मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावर तो दबाव कुठेच दिसून आला नाही. अर्जुन एक एक बॉल टाकत गेला. ओव्हरमधील पाचव्या बॉलवर भुवनेश्वर कुमार याला रोहित शर्माकरवी कॅच आऊट केलं. यासह हैदराबाद ऑलआऊट झाली आणि अर्जुनला आयपीएलमधील पहिली विकेटही मिळाली.

अर्जुनच्या या कामगिरीनंतर त्याचं टीममधील सहकाऱ्यांनी कौतुक केलं. तसेच सोशल मीडियावरही अर्जुनचं आणि सचिन या बाप बेट्याचं कौतुक होत आहे.