
आयपीएल 2024 स्पर्धेतील लिलावासाठी जबरदस्त बोली लागल्याचं पाहायला मिळालं. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. जवळपास 50 कोटींची रक्कम हे दोघंच घेऊन गेले. या लिलावात शाहरुख खानसाठीही जबरदस्त चुरस पाहायला मिळाली.

आयपीएल 2024 लिलावापूर्वी शाहरुख खानला पंजाब किंग्जने रिलीज केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रथम पंजाब किंग्सने शाहरुखला सोडले आणि त्याला लिलावात खरेदी करण्यात रस दाखवला. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू शाहरुख खानला आयपीएल 2024 च्या लिलावात गुजरात टायटन्सने 7.4 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुखला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये रस्सीखेच झाली. यात गुजरात टायटन्सने बाजी मारली.

शाहरुखने आतापर्यंत आयपीएलमधील सर्व सामने पंजाबसाठी खेळले आहेत. त्याने 33 सामन्यात 20.29 च्या सरासरीने 426 धावा केल्या आहेत. पण त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही.

शाहरुखने आयपीएलमध्ये पंजाबकडून 33 सामने खेळले. गेल्या आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त होता, पण त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव होता. लिलावात शाहरुखची बेस प्राईस 40 लाख रुपये होती.

गुजरात टायटन्सच्या मधल्या फळीत डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि रशीद खानसारखे फलंदाज आहेत. त्यात आता शाहरूख खानची भर पडली आहे. गुजरात टायटन्सचा संघ फलंदाजीत शाहरुख खानचा समावेशामुळे मजबूत झाला आहे.