
लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा घरच्या मैदानावर 6 गडी राखून पराभव केला. तसेच चेन्नईला मागे टाकत टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी चेन्नईला आणखी संघर्ष करावा लागणार आहे.

चेन्नई लखनौ सामन्यात दोन्हीकडून शतकी खेळी पाहायला मिळाली. ऋतुराजच्या शतकामुळे चेन्नईला 210 धावांपर्यंत मजल मारता आली. तर स्टोयनिसच्या शतकाने लखनौ विजय मिळाला. ऋतुराजचं शतक स्टोयनिसच्या शतकापुढे खऱ्या अर्थाने व्यर्थ गेलं.

ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दुसरं शतक झळकावलं आहे. एकदा फलंदाज आणि एकदा कर्णधार म्हणून त्याने ही कामगिरी केली आहे. पण या दोन्ही शतकी खेळी व्यर्थ गेल्या आहेत.

लखनौ विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 60 चेंडूत 108 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पण या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. शतक झळकावूनही संघाचा पराभव झालेल्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत विराट कोहलीने आत 8 शतकं झळकावली आहेत. मात्र त्यापैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी शतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड हा पहिला कर्णधार आहे. कर्णधार म्हणून मोठी खेळी करण्याचा विक्रमही नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने 84 धावा केल्या होत्या.