
सूर्यकुमार यादव, जोस बटलर आणि हेन्रिक क्लासेन या तिघांनी आतापर्यंत आयपीएलच्या 17 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंजाब किंग्सचा फलंदाज जॉनी बेयरस्टो याने या तिघांचं कौतुक केलंय. हे तिघेही टी 20 मधील सर्वोत्तम फलंदाज असल्याचं जॉनीने म्हटलं.

सूर्या, बटलर आणि क्लासेन हे तिघेही टी 20 क्रिकेट विश्वातले सर्वोत्तम फलंदाज असल्याचं जॉनीने म्हटलं. सूर्याने या हंगामातील आतापर्यंत 4 सामन्यात 2 अर्धशतकांसह 130 धावा केल्या आहेत. सूर्या 2 वेळा झिरोवर आऊट झाला.

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर याने 2 शतकं ठोकली आहेत. बटलरचा सर्वोत्तम स्कोअर हा 107 आहे.

बटलरने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 6 सामन्यात राजस्थ नकडून खेळताना 250 धावा केल्या आहेत. बटलरने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला होता.

हैदबादाचा फलंदाज हेन्रिक क्लासेन यानेही आतापर्यंत तोडफोड बॅटिंग केली आहे. क्लासेनने या हंगामातील 6 सामन्यात 3 अर्धशतकांसह 253 धावा केल्या आहेत.