
क्रिकेट चाहत्यांना विविध आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांनंतर आता आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं वेध लागलं आहे. आयपीएल 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

यंदाच्या 17 व्या मोसमातील सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. ही लढत थेट महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विराट कोहली अशी होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

तर 5 वेळेस चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे.

मात्र पहिल्या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईच्या टीममधील स्टार बॉलर हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पलटणसाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सने जेसनच्या जागी दुसऱ्या वेगवान गोलंदाजाचा टीममध्ये समावेश केला आहे.

जेसन बेहरनडॉर्फ याने मुंबईसाठी गेल्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली होती. जेसन बेहरनडॉर्फ याने 12 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या होत्या.

आता जेसनच्या जागी मुंबई इंडियन्समध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ल्यूक वूड याचा समावेश करण्यात आला आहे. वूडला पलटणने 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं आहे.