IPL 2024, MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम, आता काय केलं ते वाचा

| Updated on: Apr 07, 2024 | 9:59 PM

मुंबई इंडियन्सने सलग तीन पराभवानंतर अखेर विजयाची चव चाखली आहे. दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत करत विजयाचा ट्रॅकवर आला आहे. या सामन्यात रोहित शर्माने 49 धावांची वादळी खेळी केली. यासह टी20 क्रिकेटमधील एक दुर्मिळ विक्रम रचला आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयासाठी 234 धावांच आव्हान दिलं होतं. मात्र दिल्ली कॅपिटल्सचा संघ 205 धावा करू शकला. मुंबई इंडियन्सने दिल्लीवर 29 धावांनी विजय मिळवला.

2 / 6
मुंबई इंडियन्सकडून सलामीला येत रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. 27 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ विक्रम रचला आहे.

3 / 6
रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एकूण 6 चौकारांसह 1505 चौकार पूर्ण केले आहेत. या फॉरमॅटमध्ये 1500 हून अधिक चौकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

4 / 6
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा या यादीतील दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 1486 चौकार लगावले आहेत. त्याला 1500 चौकार पूर्ण करण्यासाठी 14 चौकार हवे आहेत.

5 / 6
जागतिक क्रिकेटमध्ये टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 2196 चौकार मारले असून पहिल्या स्थानावर आहे.

6 / 6
इंग्लंडचा माजी सलामीवीर एलेक्स हेल्सने 1855 चौकार मारले असून दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 1673 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.