
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची यंदा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सुरुवात निराशाजनक राहिली. आरसीबीला पहिल्या 8 पैकी 7 सामन्यात पराभूत व्हावं लागलं.

आरसीबीने आपल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर तब्बल 6 सामने आरसीबीने गमावले.

आरसीबीची स्थिती 8 सामन्यानंतर 2 पॉइंट्स अशी होती. मात्र त्यानंतर आरसीबीने कमबॅक म्हणजे काय असतं हे दाखवून दिलं.

आरसीबीने धोकादायक बॅटिंग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला पराभवाचा इंगा दाखवला. आरसीबीने हैदराबाद विरुद्ध पराभवाची मालिका तोडत सलग 5 सामने जिंकले.

आरसीबीचे सध्या 13 सामन्यांमध्ये 12 पॉइंट्स आहेत. आरसीबीने सलग 5 सामने जिंकल्याने प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं आहे.

आरसीबीचा साखळी फेरीतील 14 वा आणि अखेरचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध असणार आहे. चेन्नईसाठी हा सामना करो या मरो असा आहे. चेन्नईने हा सामना जिंकला तर ते प्लेऑफमधील पोहचतील. तसेच आरसीबीचा पराभव झाल्यास त्यांचा प्रवास इथेच संपेल. त्यामुळे शनिवारी 18 मे रोजी होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.