IPL 2024 : विराट कोहलीचा फॉर्म पाहून आरसीबीला फुटला घाम! कसं सांगायचं ते कळेना

| Updated on: Apr 08, 2024 | 8:09 PM

आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची स्थिती निराशाजनक राहिली आहे. पाच पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे. तर चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. विराट कोहली या पर्वात चांगलाच फॉर्मात आहे. मात्र त्याचा फॉर्म आरसीबीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

1 / 5
आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करून विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने या पर्वातील पहिलं शतक ठोकलं. मात्र असं असूनही आरसीबीला पराभवाला सामोरं जावं लागलं.

2 / 5
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली. विराट कोहलीने एकट्याने 12 षटकं खेळली. पण संघाची धावसंख्या ही 20 षटकात 3 गडी बाद 183 इतकीच राहिली. म्हणजेच अवांतर धावा आणि इतर खेळाडूंचा वाटा पाहता 48 चेंडूत 70 धावा आल्या.

3 / 5
विराट कोहलीने पाच सामन्यात 2 अर्धशतकं आणि एका शतकाच्या जोरावर 316 धावा केल्या आहे. या धावसंख्येच्या आसपासही दुसरा खेळाडू नाही. साई सुदर्शन दुसऱ्या स्थानावर असून त्याने 191 धावा केल्या आहेत. म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या स्थानात 125 धावांचं अंतर आहे. असं असून विराटचा स्ट्राईक रेट हवा तसा नाही, अशी चर्चा आता रंगली आहे.

4 / 5
विराट कोहलीचा स्ट्राईक रेट 146.29 इतका आहे. तर आरसीबीकडून खेळणाऱ्या महिपाल लोमरोरचा स्ट्राईक रेट हा 238 पेक्षा जास्त आहे. लोमरोर प्लेइंग इलेव्हनचा भाग नसताना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अशी कामगिरी केली आहे. दोन सामन्यात त्याने 21 चेंडूत 50 धावा केल्या असून स्ट्राईक रेटच्या बाबतीत विराटच्या तुलनेत उजवा ठरला आहे.

5 / 5
विराट कोहली संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र संघासाठी जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा करण्याची गरज आहे. 20 षटकात संघाला मोठी धावसंख्या झटपट उभारण्यात मदत होईल, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आरसीबीचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी 11 एप्रिलला आहे.