
विराट कोहलीची बॅट राजस्थान विरुद्ध चांगलीच तळपली. या पर्वातील पहिलं शतक ठोकण्याचा मान विराट कोहलीला मिळाला. विराट कोहलीने 67 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या.

विराट कोहलीने या सामन्यात 34 धावा केल्या आणि आयपीएलमध्ये 7500 धावा पूर्ण केल्या. यासह या लीगमध्ये अशी कामगिरी करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 242* सामने खेळले आहेत. त्याने 234 डावांमध्ये 38 च्या सरासरीने आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 7500* धावा केल्या आहेत. तसेच या लीगमध्ये विराट कोहलीने 51 अर्धशतके आणि 8 शतके झळकावली आहेत.

विराट कोहलीने 62 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने राजस्थानविरुद्ध आतापर्यंत 30 सामन्यांत 731 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये एकाच संघासाठी 8000 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली एकमेव खेळाडू ठरला आहे. आरसीबीसाठी 241 सामने आणि चॅम्पियन्स लीगमध्ये 15 सामने खेळले आहेत.

IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात विराटने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 20 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. यानंतर पंजाब किंग्जविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात कोहलीने 49 चेंडूत 77 धावा केल्या आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने केवळ 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या चौथ्या सामन्यात विराटने 22 धावा केल्या.