
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टीम इंडियाचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या शतकासह हा विक्रम नोंदवला गेला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. टीम इंडियाच्या 219 टी20 सामन्यात फलंदाजांनी 17 शतकं झळकावली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टी20 क्रिकेटमध्ये हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता.

टीम इंडियाचा हा विक्रम आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर नोंदवला गेला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 246 सामने खेळणाऱ्या आरसीबीने 18 शतकं झळकावली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये आरसीबी हा सर्वाधिक शतकं झळकवणारा संघ ठरला आहे.

आरसीबीसाठी विराट कोहलीने 8 शतकं झळकावली आहेत. मनिष पांडेने 1, ख्रिस गेलने 5, एबी डिव्हिलियर्सने 2. देवदत्त पडिक्कलने 1 आणि रजत पाटीदारने 1 शतक झळकावलं आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर आहे. त्याने 14 शतकं झळकावत पंजाब किंग्स संघ दुसऱ्या स्थानावर, तर 14 शतकं झळकावात राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे.