RR vs DC : आयपीएलमधील चौथं मोठं षटक टाकण्याचा नकोसा मान संदीप शर्माला, काय ते वाचा

राजस्थान रॉयल्सची आयपीएल 2025 स्पर्धेतील कामगिरी हवी तशी झालेली नाही. संजू सॅमसनच्या नेतृत्वात संघाला विजयापेक्षा पराभवाचं तोंड सर्वाधिक वेळा पाहावं लागलं आहे. संघातील सर्वच खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहे.

| Updated on: Apr 16, 2025 | 10:06 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेतील 32व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले होते. राजस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 188 धावा केल्या आणि विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं आहे. (Photo- PTI)

2 / 5
16 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना मोठी आणि वेगवान खेळी खेळण्यात अपयश आले. राजस्थानच्या गोलंदाजांनी दिल्लीला नियंत्रणात ठेवले. (Photo- PTI)

3 / 5
संदीप शर्माने या सामन्यात चांगली भूमिका बजावली होती. 3  षटकांत फक्त 14 धावा दिल्या होत्या. शेवटच्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी त्याच्याकडे शेवटचं षटक सोपवलं गेलं. संदीपच्या कामगिरीचा विचार करता हा निर्णय योग्य होता. (Photo- PTI)

4 / 5
संदीप शर्माने शेवटचं षटक 11 चेंडूंच टाकलं आणि 19 धावा दिल्या. यात 4 वाईड आणि एक नो बॉल टाकला. खरं तर दिल्लीच्या 19 व्या षटकापर्यंत 169 धावा होत्या. पण संदीप शर्माचं महागडं षटक पडल्याने 188 धावांपर्यंत मजल मारली. त्याने 4 षटकात 33 धावा दिल्या. (Photo- IPL)

5 / 5
आयपीएल इतिहासात एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आरसीबीकडून खेळताना मोहम्मद सिराजने 2023 मध्ये 11 चेंडू टाकले होते. त्यानंतर 2023 यावर्षी तुषार देशपांडने 11 चेंडूचं षटक टाकलं होतं. यंदाच्या आयपीएलमध्ये शार्दुल ठाकुरने 11 चेंडूंच षटक टाकलं होतं. आता या यादीत संदीप शर्मा बसला आहे. (Photo-Getty Image)