IPL 2025 : प्लेऑफसाठी 4 संघ फिक्स, आता टॉप 2 साठी चुरस

IPL 2025 Playoffs : आयपीएलच्या प्रत्येक मोसमात साखळी फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या 4 संघामध्ये टॉप 2 साठी चुरस असते.

| Updated on: May 22, 2025 | 1:20 AM
1 / 5
मुंबई इंडियन्सने 21 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील आठवा विजय ठरला. मुंबईच्या विजयासह आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्सनंतर मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला. त्यामुळे आता टॉप 2 साठी चुरस पाहायला मिळणार आहे. (Photo Credit : IPL/BCCI)

2 / 5
गुजरात टायटन्सच्या खात्यात सध्या 18 गुण आहेत. गुजरातने  उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर टॉप 2 मध्ये राहतील. मात्र गुजरातचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तर आरसीबी आणि पंजाब किंग्सला टॉप 2 मध्ये येण्याची संधी मिळू शकते. (Photo Credit : Ishant Sharma X Account)

3 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 12 सामन्यात 17 गुण मिळवले आहेत. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर 21 गुण होतील. पण पंजाब किंग्सच्या तुलनेत नेट रनरेट चांगला ठेवला तर टॉप 2 मध्ये राहील. पंजाब किंग्सचा उर्वरित सामन्यात पराभव झाला तर आरसीबीला संधी मिळेल. (Photo Credit : @RCBTweets X Account)

4 / 5
पंजाब किंग्सने 12 सामन्यात 17 गुण मिळवले आहेत. पंजाब उर्वरित दोन सामने जिंकले तर 21 गुण होतील. पण पंजाबचा आरबीसीपेक्षा नेट रनरेट चांगला असेल तर टॉप 2 मध्ये स्थान मिळेल. (Photo Credit : @PunjabKingsIPL)

5 / 5
मुंबई इंडियन्सचे 13 सामन्यात 16 गुण आहेत. आता एका सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील. पण आरसीबीच्या जय-पराजयावर अवलंबून राहावं लागेल. आरसीबीचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तरच संधी मिळेल. मुंबईचा साखळी फेरीतील शेवटचा सामना पंजाबविरुद्ध होणार आहे. (Photo Credit : @IPL X Account)