IPL 2025 : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पात्र होणार! उर्वरित सहा सामन्यात असं असेल गणित

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतल्याचं दिसत आहे. सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित आणखी सोपं होत असल्याचं दिसत आहे.

| Updated on: Apr 21, 2025 | 2:53 PM
1 / 5
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत दोन गुणांची कमाई केली आहे. मुंबई इंडियन्स 8 गुण आणि +0.483 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची चांगली संधी आहे. उर्वरित सहा सामन्यात फक्त 4 सामन्यांचं गणित सोडवावं लागणार आहे.

2 / 5
प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी 16 गुणांचं गणित सोडवलं की टॉप 4 चा गुंता सुटतो. त्यामुळे उर्वरित सहा पैकी 4 सामन्यात विजय मिळवला तर 16 होतील. पण 14 गुण मिळवले तर मुंबईला नेट रनरेटच्या आधारावर टॉप 4 चं गणित सोडवावं लागेल.

3 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला अजून सहा सामने खेळायचे आहेत. यात सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचा समावेश आहे.

4 / 5
दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सविरुद्धचा सामना महत्त्वाचा असणार आहे. कारण हे तीन संघ गुणतालिकेत टॉप 4मध्ये आहेत. या संघांना पराभूत केलं तर गुणतालिकेत उलथापालथ होईल आणि मुंबईचा संघ टॉप फोरमध्ये येईल.

5 / 5
मुंबई इंडियन्सचे लक्ष थेट पात्रता फेरीवर असेल. कारण टॉप 2 संघांना विजयानंतर थेट अंतिम फेरीत स्थान मिळतं. यासाठी मुंबईला उर्वरित सर्व सहा सामने जिंकावे लागतील. पण गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांचा फॉर्म पाहता ही मोठी लढाई आहे. पण मुंबई इंडियन्साठी हे गणित अशक्य नाही. (सर्व फोटो- आयपीएल/बीसीसीआ/ट्विटर)