
आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पंजाब किंग्सने 19व्या षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं आणि अंतिम फेरी गाठली. यासह पंजाब किंग्सने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. (Photo_PBKS Twitter)

पंजाब किंग्सने 11 वर्षानंतर आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तेव्हा पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता जेतेपदाची आस वाढली आहे. (Photo_PBKS Twitter)

आयपीएल प्लेऑफमध्ये 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी बाद फेरीत इतक्या धावांचा पाठलाग करण्यात संघांना यश आलं नव्हतं. पण पंजाबने ते मिथक मोडीत काढलं आहे. 204 धावांचा 6 चेंडू राखून पाठलाग केला. (Photo_PBKS Twitter)

मुंबई इंडियन्सविरुद्ध 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणं कोणत्याही संघाला जमलं नव्हतं. पण ते श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात शक्य झालं आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्यांदाच पंजाब किंग्स 204 धावांचा यशस्वी पाठलाग केला. (Photo_PBKS Twitter)

पंजाब किंग्सने आयपीएलमध्ये आठव्या संघाविरुद्ध यशस्वी 200 हून अधिक धावांचा पाठलाग केला आहे. हा देखील एक विक्रम असून असं कोणत्याही संघाला जमलेलं नाही.(Photo_PBKS Twitter)

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सने नवव्यांदा 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. एकाच पर्वात इतक्यांदा 200हून अधिक धावांचा पाठलाग करणं हा देखील एक विक्रम आहे. (Photo_PBKS Twitter)