
आयपीएल 2025 स्पर्धेतील 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. फलंदाजीसाठी कठीण असा खेळपट्टीवर सूर्यकुमार यादवने सुरुवातीला सावध पण शेवटी आक्रमक फटकेबाजी केली. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादव ऑरेंज कॅपच्या शर्यतीत यशस्वी जयस्वालच्या पुढे गेला आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 36 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकी खेळीच्या जोरावर या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी या स्थानावर राजस्थानचा यशस्वी जयस्वाल होता. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध यशस्वी जयस्वालने 43 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 7 चौकार मारले. सूर्यकुमार यादवने 13 सामन्यात 170.47 च्या स्ट्राईक रेटने 583 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालच्या नावावर 559 धावा आहेत. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

आयपीएल स्पर्धेतील ऑरेज कॅप सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या साई सुदर्शनच्या डोक्यावर आहे. त्याने 12 सामन्यात 617 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावर शुबमन गिल असून त्याने 601 धावा केल्या आहे. तिसऱ्या स्थानावर 583 धावांसह सूर्यकुमार यादव आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)

सूर्यकुमार यादवने 13 डावात सलग 25हून अधिका धावा करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी बावुमाने 13 सामन्यात सलग 25हून अधिक धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने टेम्बा बावुमाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (फोटो- आयपीएल/बीसीसीआय)