IPL 2026: संजू सॅमसनचं स्पर्धेतील पहिलं झंझावाती शतक, नोंदवले इतके सारे विक्रम

IPL 2026, Sanju Samson: आयपीएल 2026 स्पर्धेच्या 18व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात संजू सॅमसनने चांगली खेळी केली.

| Updated on: Apr 11, 2026 | 9:11 PM
1 / 7
आयपीएल 2026 स्पर्धेच्या 18व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला फलंदाजी आली. या सामन्यात संजू सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष होतं. (Photo: CSK Twitter)

2 / 7
संजू सॅमसन मागच्या तीन सामन्यात फेल गेला होता. एकेरी धावा करून बाद होत होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा हिरमोड झाला होता. इतकंच काय आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. (Photo: CSK Twitter)

3 / 7
संजू सॅमसन पहिल्या तीन सामन्यात फेल गेल्यानंतर चौथ्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. संजू सॅमसनने 46 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकार मारत शकत पूर्ण केलं. त्याने 53 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं. संजू सॅमसनने 26 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 192.31 चा होता. (Photo- CSK Twitter)

4 / 7
आयपीएल स्पर्धेत 2021 नंतर संजू सॅमसनने पहिलं शतक ठोकलं गेलं आहे. संजू सॅमसनने या पर्वातील पहिल्या शतकाची नोंद केली आणि फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं.  (Photo: IPL/BCCI)

5 / 7
संजू सॅमसनचं आयपीएल स्पर्धेतील चौथं शतक आहे. त्याने पहिलं शतक 2017 मध्ये पुण्याविरूद्ध, दुसरं शतक 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध, तिसरं शतक 2021मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध आणि आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक ठोकलं आहे.  (Photo- CSK Twitter)

6 / 7
संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2012 मध्ये मुरली विजयने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 58 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती.  (Photo- CSK Twitter)

7 / 7
संजू सॅमसनने आयुष म्हात्रेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 100हून अधिक धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने आयपीएल स्पर्धेतील 400 षटकार पूर्ण केलं आहेत. रोहित शर्माने 554, विराट कोहलीने 441 आणि सूर्यकुमार यादवने 442 षटकार मारले आहेत.  (Photo: CSK Twitter)

Follow Us