IPL 2026 : क्रिकेटरला PSL सोडताच पावणे 2 कोटींचा फायदा, आयपीएल स्पर्धेत कोणत्या संघाकडून खेळणार?

Dasun Shanaka : पाकिस्तानची आधीच वाट लागलीय. त्यात आता क्रिकेटबाबतीतही पाकिस्तानला झटका लागला आहे. आयपीएल स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या एका खेळाडूने पीएसएल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या तो कोण आहे.

| Updated on: Mar 23, 2026 | 8:39 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेसाठी आतापर्यंत बहुतांश खेळाडूंनी पाकिस्तानमधील पीएसएल या स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे.  अनेक खेळाडूंनी पीएसएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहे.आता या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
श्रीलंकेचा टी 20I संघाचा कर्णधार दासुन शनाका याने पीएसएलची साथ सोडून आयपीएलच्या 19 व्या मोसमात खेळण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने दासुनला आपल्या गोटात घेतलं. आहे. दासुनला इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम करन याच्या जागी घेण्यात आलं आहे. सॅमला दुखापतीमुळे या संपूर्ण 19 व्या हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
दासुन शनाका याला 19 व्या मोसमासाठी झालेल्या मिनी ऑक्शनमधून कुणीच घेतलं नाही.  त्यामुळे शनाका पीएसएल स्पर्धेकडे वळला. दासुनसाठी लाहोर कलंदर्स टीमने 75 लाख रुपये मोजले. मात्र आता दासुनने ती ऑफर धुडकावत आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
दासुनला आयीपएल स्पर्धेत खेळण्याच्या निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या तगडा फायदा झाला आहे. राजस्थानने दासुनसाठी पावणे 2 कोटी रुपये मोजले आहेत. दासुनला पीएसएलमध्ये खेळल्यास भारतीय रुपयांमध्ये 25 लाख रुपये मिळाले असते. मात्र आता आयपीएलमुळे त्याला 1 कोटी 75 लाख रुपये मिळणार आहेत.  (Photo Credit: PTI)

5 / 5
दासुन शनाका याची आयपीएल स्पर्धेत बदली खेळाडू म्हणून सहभागी होण्याची तिसरी वेळ ठरली आहे. दासुनने याआधी गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. दासुनने आयपीएलमध्ये 3 सामन्यांमध्ये फक्त 26 धावाच केल्या आहेत. (Photo Credit: PTI)

Follow Us