IPL 2026 : पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने केली मोठी चूक, बीसीसीआयने उचलला कारवाईचा बडगा

आयपीएल 2026 स्पर्धेतील 55वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. असं असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला मात्र भुर्दंड भरावा लागला.

| Updated on: May 12, 2026 | 5:11 PM
1 / 5
बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलवर कारवाई केली आहे. पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अक्षर पटेल आता आयपीएल 2026 च्या दंड झालेल्या कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
 पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 210 धावा केल्या. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 19व्या षटकात तीन गडी राखून आणि एक षटक शिल्लक ठेवून पूर्ण केलं. पण पंजाब किंग्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटचा फटका दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला बसला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
आयपीएल 2026 मध्ये डीसीचा कर्णधार अक्षर पटेलवर धीम्या षटकांच्या गतीचे उल्लंघन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळेच त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  या चुकीसाठी  कर्णधार अक्षर पटेलला मिळालेली आतापर्यंतची सर्वात कमी शिक्षा आहे. दुसऱ्यांदा चूक केली तर मोठा भुर्दंड भरावा लागेल. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
अक्षर पटेलच्या आधी, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या कर्णधारांनाही आयपीएल 2026 मध्ये धीम्या षटकांच्या गतीचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. श्रेयस अय्यरला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
दिल्ली कॅपिटल्सचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर 14 गुण होती. या स्पर्धेतील गुणतालिकेत आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सचे आधीच 14 गुण झाले आहेत. त्यामुळे पंजाब किंग्सने एक विजय मिळवताच दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us