IPL 2026: शेवटच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, असं करण्याचं कारण की…
Mumbai Indians: आयपीएल 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता या स्पर्धेतील शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. संघात अचानक दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.

आयपीएल स्पर्धेत पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना मुंबई इंडियन्स संघाने संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे क्विंटन डिकॉक आणि राज अंगद बावा हे खेळाडू संघातून आऊट झाले आहेत. त्यांच्याऐवजी संघात दोन खेळाडू सहभागी केले आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

मुंबई इंडियन्सने अनुभवी अष्टपैलू महिपाल लोमरोर आणि सौराष्ट्राकडून खेळणाऱ्या रूचित अहीरला संघात घेतलं आहे. या दोन्ही खेळाडूंची मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यासाठी निवड झाली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

मुंबईचा स्टार ओपनर आणि विकेटकीपर क्विंटन डीकॉक दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचा पर्याय म्हणून महिपाल लोमरार याला 50 लाखांच्या फीवर संघात घेतलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

मुंबईने सौराष्ट्राच्या 25वर्षी युवा खेळाडू रूचित अहीर यालाही 30 लाखांच्या बेस प्राईसवर संघात घेतलं आहे. रूचितसाठी आयपीएलचा हा पहिला अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 लिस्ट ए आणि 12 टी20 सामने खेळले आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेत 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामने गमावले आहेत. तर चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. (PHOTO CREDIT- PTI)