गुजरात टायटन्सला स्पर्धेपूर्वी मोठा धक्का, लिलावात घेतलेला 3.6 कोटींचा खेळाडू बाहेर

| Updated on: Mar 16, 2024 | 7:53 PM

आयपीएल स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. स्पर्धेपूर्वीच मोहम्मद शमी दुखपतीमुळे बाहेर पडला. त्यात आणखी खेळाडू बाहेर गेल्याने टेन्शन वाढलं आहे. गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 24 मार्चला होणार आहे.

1 / 6
आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. 24 मार्चला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यापूर्वीच गुजरात टायटन्सला धक्का बसला आहे.

2 / 6
गुजरात टायटन्सने आयपीएल मिनी लिलावता 3.60 कोटीची बोली लावत युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. पण अपघातामुळे हा खेळाडू जखमी झाला आहे. त्याचं स्पर्धेत खेळणं आता कठीण असल्याचं समोर आलं आहे. 21 वर्षीय रॉबिन मिंज असं या खेळाडूचं नाव आहे.

3 / 6
रॉबिन मिंजला आयपीएल 2024 लिलावात 3.60 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. पण अपघातात जखमी झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितलं की, रॉबिन मिंज यावर्षी खेळण्याची शक्यता नाही. खूपच दुर्दैवी आहे आम्ही मिंजचा खेळाबाबत उत्सुक होतो.

4 / 6
रॉबिन मिंज झारखंडसाठी अंडर 19 आणि अंडर 25 साठी खेळला आहे. रॉबिन मिंजसाठी चेन्नई आणि गुजरात टायटन्सने फिल्डिंग लावली होती. पण लिलावात गुजरातने बाजी मारली आणि आपल्या ताफ्यात घेतलं होतं.

5 / 6
रॉबिन मिंज हा कावासाकी सुपरबाइक चालवत होता. त्यात समोरून येणाऱ्या बाइकने इतकी जोरदार धडक दिली. यामुळे बाइकचा पुढचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे.

6 / 6
अनुभवी  यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. तर मोहम्मद शमी शस्त्रक्रियेमुळे खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे  स्टार खेळाडूंच्या अनुपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर संघाचे कर्णधारपद स्वीकारणारा युवा खेळाडू शुबमन गिल संघाचे नेतृत्व कसे करणार हे पाहणे बाकी आहे.