
इंग्लंडच्या फलंदाजीचा गेल्या काही वर्षात जो रूट हा कणा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अनेक विक्रम रचले आहेत. लॉर्ड्स कसोटीतही अशीच कामगिरी पाहायला मिळाली. भारताविरुद्ध त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणं इतर खेळाडूंसाठी स्वप्नासारखं आहे. (GETTY IMAGES)

जो रूटने भारताविरुद्ध 3000 धावांचा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा जो रूट हा एकमेव खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. त्याने 2555 धावा केल्या होत्या. (GETTY IMAGES)

जो रूटने भारताविरुद्ध कसोटी 55 हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच भारताविरुद्ध 10 शतकं ठोकली आहेत.(GETTY IMAGES)

लॉर्ड्सवर जो रूटने भारताविरुद्ध 3000 धावा पूर्ण केल्या. तसेच सचिन तेंडुलकरचा एक मोठा रेकॉर्ड रडारवर आला आहे. (GETTY IMAGES)

जो रुटने कसोटी 67 अर्धशतकं ठोकली आहे. आात सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डपासून फक्त एक अर्धशतक दूर आहे. सचिनने कसोटी सर्वाधिक 68 अर्धशतकं ठोकली आहेत. (GETTY IMAGES)