
कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीवर 81 धावांनी विजय मिळवला. केकेआरचा ऑलराउंडर शार्दुल ठाकूर हा या विजयाचा हिरो ठरला. शार्दूलने बॅटिंग आणि बॉलिंगने अष्टपैलू कामगिरी केली.

कोलकाता अडचणीत असताना रिंकू सिंहसोबत सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 103 रन्सची पार्टनरशीप केली. शार्दूलने यादरम्यान आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं

शार्दुलने 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. शार्दुल यासह आयपीएलच्या 16 व्या मोसमात संयुक्तपणे वेगवान अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर याने सनराजयर्स हैदराबाद विरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

शार्दुलने 29 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांची वादळी खेळी केली. शार्दुलचं आयपीएलमधील हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तसेच शार्दुलची ही आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

तसेच शार्दुलने यानंतर बॉलिंग करताना मायकेल ब्रेसवेल याला आऊट करत एकमेव विकेट घेतली. शार्दूलने अशा प्रकारे कोलकाताच्या विजयात मोठी भूमिका बजावली.