
मुंबई इंडियन्सच्या टिम डेविडने काल जबरदस्त खेळ दाखवला. त्याने 14 चेंडूत नाबाद 45 धावा ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने लास्ट ओव्हरच्या 3 चेंडूत 3 सिक्स मारले.

IPL च्या 15 व्या सीजनवर काही खेळाडूंनी आपली विशेष छाप उमटवली होती. त्यापैकी टिम डेविड एक होता. आता हाच टिम डेविड चालू सीजनमध्ये तशीच कामगिरी करतोय.

टिम डेविडचं खासगी आयुष्य कसं आहे, या बद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. तर डेविडची पत्नी एक प्रसिद्ध हॉकीपटू आहे. ती ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व करते.

स्टेफनी करशॉ हे टिम डेविडच्या पत्नीचं नाव आहे. डेविड प्रमाणे त्याच्या बायकोने सुद्धा स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय.

टिम डेविड फ्रेंचायजी क्रिकेटमध्ये लोकप्रिय नाव आहे, तर स्टेफनी करशॉ महिला हॉकी मधली एक नावाजलेली खेळाडू आहे.